बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! शिवसेनेच्या रणरागिणीचं कोरोनामुळे निधन

नाशिक | शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका कल्पना पांडे यांचे कोरोनामुळे निधन झालं आहे. आज पहाटेच्या सुमारास कल्पना पांडे यांची प्राणज्योत मालवली. कल्पना पांडे या नाशिक प्रभाग क्रमांक 24 चे प्रतिनिधित्व करत होत्या.

कल्पना पांडे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर नाशिकमध्ये एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने शिवसैनिकांना जबरदस्त धक्का बसला आहे.

नाशिक महापालिका निवडणुकीत त्या सलग चार वेळा निवडून आल्या होत्या. कल्पना पांडे यांनी सिडको प्रभाग सभापती म्हणून दोन वेळा काम पाहिले आहे. तसेच नाशिक महापालिकेतील अनेक समित्यांवरही त्यांनी काम केलं आहे. कोरोना काळात कल्पना पांडे  /यांनी रुग्णाला रुग्णालय मिळवून देणं, औषधाची सोय करणं, जनजागृती करणं, यासारखी अनेक कामं केली.

दरम्यान, राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. पुण्यातही कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतेय. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे पुण्यातील रुग्णालयेही आता अपुरी पडू लागली आहे.

थोडक्यात बातम्या- 

मोदींच्या कानात बोलणाऱ्या युवकानं ओवैसींना फटकारलं, “बाहेरील व्यक्तीला देशात कसं राहू देऊ?”

तुमचं घराचं स्वप्न पूर्ण होणार; गुढीपाडव्याला म्हाडाची मोठी सोडत

“शपथ घेतल्यापासून महाविकासआघाडी सरकार सापाला दूध पाजतंय”

राज्यासाठी जो निर्णय असेल, तो पुण्यासाठी नको- अजित पवार

विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या पोलिसाला जबर मारहाण!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More