बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का, आमदारांपाठोपाठ नगरसेवकही शिंदे गटात

मुंबई | एकनाथ शिंदेंच्या बंडाळीनंतर शिवसेनेला दिवसेंदिवस नवनवीन धक्के बसत आहेत. 40 आमदारांची बंडखोरी आणि नंतर सत्तेतून पायउतार व्हावे लागणे, असे एक एक धक्के खात असताना शिवसेनेने आता जिल्हाप्रमुख आणि नगरसेवकांकडून लेखी करार लिहून घ्यायला सुरु केली आहे. त्यातच आता शिवसेनेला सोडचिट्ठी देत शिवसेनेचे नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत.

नगरसेवक नाना भानगिरे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. भानगिरेंच्या पक्षातून जाण्यामुळे पुणे शहरात शिवसेनेला मोठे खिंडार पडणार आहे. भानगिरेंनी आतापर्यंत तीन वेळा विधानसभेची निवडणूक लढवली आहे. तर शिवसेनेकडून ते तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. भानगिरेंच्या रुपात  पुण्यातून पहीलाच लोकप्रतिनीधी शिंदे गटाला मिळाल्याची माहिती समोर येत आहे.

नाना भानगिरे यांना विधान परिषद आमदार पदाची संधी किंवा राज्यातील महामंडळाचे अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील जबाबदारी भानगिरेंना मिळणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरसेवकांची सभा बोलावली आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत शिंदे गट शिवसेनेला धक्का देणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार आले. सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना कमजोर होऊ लागली असल्याचे चित्र सगळीकडे दिसत आहे. पुण्यातील ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक नाना भानगिरे यांना शिंदे गटाने थेट मुंबईत पाचारण केले असल्याने शिवसेनेची भीती अजून वाढली आहे.

थोडक्यात बातम्या-

लालू प्रसाद यादव यांची तब्येत खालावली, महत्त्वाची माहिती समोर

‘… तरी शिवसेनेला 100 हून अधिक जागा मिळतील’, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

उद्धव ठाकरेंना बावरट करणारे ‘ते’ चार जण कोण?, गुलाबरावांचा रोख कुणाकडे???

‘ज्या चार लोकांच्या नावानं बोटं मोडता, त्या चार लोकांंमुळेच…’, संजय राऊत कडाडले

‘शरद पवार म्हणजे काही…’, केतकी चितळे स्पष्टच बोलली

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More