शिवसेनेच्या दोन नगरसेवकांमध्ये वाद; एकाने लगावली दुसऱ्याच्या कानशिलात

शिवसेनेच्या दोन नगरसेवकांमध्ये वाद; एकाने लगावली दुसऱ्याच्या कानशिलात

नवी मुंबई | स्थायी समितीच्या टक्केवारीवरून शिवसेनेच्या दोन नगरसेवकांमध्ये वादावादी झाली. शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत यांनी शिवसेनेचेच नगरसेवक रंगनाथ औटी यांच्या कानशिलात लगावली.

स्थायी समिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे, तरिही समितीची आर्थिक वसुली शिवसेनेचे नगरसेवक करत होते. एका कामाच्या टक्केवारीची विचारणा केल्याने हा वाद पेटला अन् थेट हाणामारीपर्यंत पोहोचला.

विशेष म्हणजे हा सगळा प्रकार ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत झाला. त्यानंतर शिंदेंनी रंगनाथ औटींची समजूत काढल्याचं समजतंय.

दरम्यान, पक्षाची बदनामी टाळण्यासाठी हे प्रकरण दडपल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

महत्वाच्या बातम्या-

-उद्धव ठाकरेंचं पीक विमा आंदोलन होऊच देणार नाही- सुभाष देशमुख

मराठा आरक्षण मिळालं… अन् शेतकऱ्याचा मुलगा झाला क्लास-2 अधिकारी!

-“…म्हणून मुंबई महापालिकेविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करा”

-“लोकसभा निवडणुकीनंतर विरोधक आहेत का नाही हे मी शोधतोय”

-जॉन सीनाने शेअर केलेल्या मीम्सवर शिल्पा शेट्टीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Google+ Linkedin