बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ठाकरे कुळाने वाघाच्या छातीने संघर्ष केला म्हणून आज महाराष्ट्र दिल्लीपुढे न झुकता उभाय”

मुंबई | शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर सडकून टीका केली आहे .फडणवीस आणि त्यांचे सर्वच बापजादे महाराष्ट्राचा लचका तोडण्याचे स्वप्न पाहत होते, ‘महाराष्ट्र दिनी’ दंडास काळ्या फिती बांधून 105 हुतात्म्यांचा अपमान करी होते तेव्हा ‘ठाकरे’ अखंड महाराष्ट्रासाठी वाघाचे पंजे मारत होतं. आज मुंबई-विदर्भ महाराष्ट्रापासून तोडण्याची कोणाची औकात नाही ती फक्त ठाकरे आणि शिवसेनेमुळेच, असं सांगत शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला आहे.

शिवसेनेने बलिदाने दिली व समस्त ठाकरे कुळाने वाघाच्या छातीने संघर्ष केला म्हणून आज मुंबईसह महाराष्ट्र दिल्लीपुढे न झुकता उभा आहे, असंही शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलंय.

शिवसेना म्हणजे वाघावर स्वार झालेल्या मर्दांचा पक्ष आहे व आज उद्धव ठाकरे त्यांचे नेतृत्व करीत आहेत. ठाकरे नसते तर महाराष्ट्रात मराठी स्वाभिमान व अस्मिता खतमच झाली असती, असंही अग्रलेखात म्हटलंय.

नाशिकचे पंचवटी आणि नागपूरजवळील रामटेक हे प्रभू श्रीरामाच्या वास्तव्याने पावन झाले, पण नागपूरच्या फडणवीसांनी श्रीरामाचा सत्यवचनाचा गुण घेतलेला दिसत नाही. ते सध्या फक्त खोटे आणि खोटेच बोलत आहेत, अशी टीका शिवसेनेनं फडणवीसांवर केलीये.

थोडक्यात बातम्या- 

“जिसको हलके मे लिया है वो महाबली हल्क है रे टरबूज भोंग्या…”; दिपाली सय्यदांची फडणवीसांवर टीका

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हुसेन दलवाई यांचं निधन

‘स्वतःच्या बायकोला लोक बोलली तर…’; रूपाली चाकणकर भडकल्या

“आम्हाला 2024 ला पुन्हा मुख्यमंत्री पदी ब्राह्मण समाजाचे देवेंद्रे फडणवीस हवेत”

रावसाहेब दानवेंच्या ‘त्या’ वक्तव्याला आता रामदास आठवलेंचा पाठिंबा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More