बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“माथेफिरू गुणरत्नांना मांडीवर घेऊन आग लावणारे…”

मुंबई | संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानाबाहेर हिंसक आंदोलन केलं. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. यानंतर शिवसेनेने भाजप (BJP) व एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्यावर सामना अग्रलेखातून सडकून टीका केली आहे.

शरद पवारांच्या घरावर हल्ला म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय सलोख्यास, संस्कृतीस काळीमा फासणारे कृत्य आहे, अशी टीका सामनातून (Saamana) करण्यात आली आहे. विरोधकांना स्वत:ला ज्या लढाया लढता येत नाहीत तेथे असे गुणरत्न ताब्यात घेऊन त्यांच्या डोक्यात झिंग भरून महाविकास आघाडीच्या विरोधात उभे केले जाते, असा टोलाही सामनातून लगावण्यात आला आहे.

विरोधी पक्षाने महाविकास आघाडीशी राजकीय विचाराने संघर्ष करायला हरकत नाही. पण माथेफिरू गुणरत्नांना मांडीवर घेऊन आग लावणारे महाराष्ट्राचे व मराठी परंपरेचे नुकसान करत आहेत. महाराष्ट्रात तरी नेत्यांवर असे हल्ले करण्याची परंपरा नाही, असा घणाघात सामनातून करण्यात आला आहे.

दरम्यान, काही माकडं अजूनही माकडंच राहिली. त्या माकडांच्या हातात विरोधी पक्षाने कोलीत देऊ नये. महाराष्ट्र गुणांचा पूजक आहे. माथेफिरू गुणरत्नांचा नाही, असा खोचक टोला शिवसेनेने भाजपला लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

LIC ची भन्नाट योजना! फक्त 73 रूपये गुंतवून मिळू शकतात 10 लाख रूपये

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाबाबत अमेरिकेचा मोठा दावा

राज ठाकरेंच्या नातवाची पहिली झलक आली समोर, पाहा फोटो

“भाजपचे काही नेते पिसाळलेला कुत्रा चावल्यागत वागत आहेत”

औरंगाबाद सेक्स व्हिडीओ प्रकरण, तृप्ती देसाईंनी थेट गृहमंत्र्यांना पाठवले व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More