Top News

…पण 1 लाखाचं ‘ठिगळ’ कसं पुरणार?; शिवसेनेचा भाजपला सवाल

मुंबई | देशभरात वाढत चाललेल्या बेरोजगारांच्या संख्येत होणाऱ्या वाढीवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून यासंदर्भात टीका करण्यात आली आहे.

केंद्रातील राज्यकर्त्यांनी निवडणुकीपूर्वी दरवर्षी 1 कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार मागील 4 वर्षात किमान 4 कोटी नोकऱ्या उपलब्ध झाल्या पाहिजे होत्या. मात्र, आज देशात 3 कोटी तरुण बेरोजगार आहेत आणि 24 लाख सरकारी जागाही रिक्त आहेत, असं शिवसेेनेनं म्हटलं आहे.

‘आयुष्मान’ या योजनेमुळे 1 लाख बेरोजगारांना नोकऱ्या मिळणार असतील तर चांगलेच आहे, पण 1 लाखाचे ‘ठिगळ’ कसे पुरणार? एक 1 रोजगारांचे आश्वासन देणाऱ्यांच्या राज्यातही रोजगाराचे घोडे पेंडच खात असेल तर कसे व्हायचे?, असा सवालही उपस्थित केला आहे.

दरम्यान, नोकऱ्या कुठं आहेत?, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं होतं. त्यांचा संदर्भ वेगळा असला तरी ते खरंच बोलले, असा टोमणाही अग्रलेखात मारला आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-मुख्यमंत्री समर्थक आमदार रवी राणा यांच्यावर अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल

-ऊसबिलाची रक्कम थकल्यानं सहकारमंत्र्यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्याची आत्महत्या

-हिना गावित हल्ला प्रकरणी 25 जणांवर अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल; 3 जणांना अटक

-उदयनराजे भोसले आणि हर्षवर्धन जाधव यांच्यात नेमंक चाललंय काय?

9 आॅगस्टला काय कराल? मराठा क्रांती मोर्चाकडून निवेदन जारी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या