‘काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्याप्रमाणे, ही भोकं शिवणार कशी?’; शिवसेनेचा प्रहार
मुंबई | गेल्या काही काळापासून गळती हा प्रकार काँग्रेसला (Congress) नवीन राहिलेला नाही. सोनिया गांधींपासून राहुल गांधींपर्यंत सगळ्यांनीच काँग्रेस पुन्हा उभी करण्याची हाक दिली असतानाच नव्याने गळतीला आरंभ व्हावा हे चिंताजनक, असं म्हणत शिवसेनेनं (Shivsena) सामना अग्रलेखातून टीका केली आहे.
पंजाबमधील काँग्रेसचे नेते सुनील जाखड आणि गुजरातमधून हार्दिक पटेल यांनी पक्षाचा त्याग केला आहे. सध्या काँग्रेसला ज्या व्यक्तींची गरज आहे, अशा नेत्यांनी काँग्रेस सोडल्याने चिंतेचा विषय ठरला आहे, असंही शिवसेनेनं सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
2024ची तयारी मोदी व त्यांचा पक्ष वेगळ्या पद्धतीने करत असताना काँग्रेसमधील गळती हंगाम सुरूच आहे आणि त्या पक्षाची अवस्था आभाळ फाटल्याप्रमाणे झाली आहे. जाखड, हार्दिक यांच्यानंतरही ठिगळे वाढतच जाण्याची भीती आहे. ही भोके शिवणार कशी?, असा सवाल देखील शिवसेनेने उपस्थित केला आहे.
दरम्यान, संसदीय लोकशाहीसाठी हे चित्र बरं नसल्याची टीका देखील शिवसेनेने केली आहे. शिवसेनेच्या या टीकेवर आता काँग्रेस काय प्रतिक्रिया देणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या-
सर्वसामान्यांना धक्क्यावर धक्के! सीएनजी पुन्हा महागलं
IANS-C Voter Survey| पंतप्रधान म्हणून आजही मोदींनाच पंसती, राहुल गांधी मात्र…
Corona Update| राज्यातील सर्वाधिक कोरोना रूग्ण मुंबईतच, वाचा आकडेवारी
राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना आवाहन, म्हणाले…
“संजय राऊतांनी सगळी शिवसेना राष्ट्रवादीची बटीक म्हणून ठेवलीय”
Comments are closed.