बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“फडणवीस मिस्टर इंडिया बनून बाबरीच्या ढाच्यांवर हातोडा मारत होते?”

मुंबई | बाबरी आम्हीच पाडली. तुम्ही भोंग्यांनाही घाबरता, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी टीका केली होती. देवेंद्र फडणवीसांच्या या टीकेला शिवसेनेने (Shivsena) सामना अग्रलेखातून प्रत्युत्तर दिलं आहे.

मी अभिमानानं सांगतो, मी तो बाबरीचा ढाचा पाडण्यासाठी त्याच ठिकाणी होतो. आता फडणवीस असं म्हणतात म्हणजे ते असणारच. पण सीबीआयच्या विशेष न्यायालयातील आरोपपत्रात त्यांचे नाव कुठेच दिसत नाही, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

शिवसेनेचे अनेक नेते व शिवसैनिकांची नावं बाबरी प्रकरणाच्या आरोपपत्रात आहेत. त्यामुळे फडणवीस हे ‘मिस्टर इंडिया’ बनून बाबरीच्या ढाच्यांवर हातोडे मारत होते का? याचा गुप्त तपास नव्याने करावा लागेल, अशी खोचक टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, फडणवीस हे उसळलेल्या हिंदू जनसागरातून घुसून बाबरीच्या घुमटावर चढले व हातोडे मारीत राहिले याची नोंद इतिहासात नसावी? हे आश्चर्यच आहे, असा घणाघात सामनातून करण्यात आला आहे. तर बाबरीच्या ढाच्यावरून श्रेयवादाची स्पर्धा इतक्या वर्षांनी करण्यात काय मतलब?, असा सवाल देखील शिवसेनेने उपस्थित केला आहे.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! राज ठाकरेंच्या घराबाहेरची सुरक्षा वाढवली

पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, वाचा तुमच्या जिल्ह्यातील आजचे दर

‘मग ते भोंगेही उतरवा तरच तुम्ही हिमतीचे’, शिवसेनेचं भाजपला खुलं आव्हान

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या राज्यांना महत्त्वाच्या सूचना, म्हणाले…

‘धुडगूस  घालण्यासाठी अक्कल लागत नाही’; अजित पवारांचा हल्लाबोल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More