मुंबई | रशिया-युक्रेन युद्धाचा आज बारावा दिवस आहे. दिवसेंदिवस युद्ध भयावह होत असताना हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा सुरू केलं. ऑपरेशन गंगावरून शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. (Russia-Ukraine War)
युक्रेनमधून हाल-अपेष्टा सहन करून जे विद्यार्थी मायदेशी पोहोचले, त्यांनी ‘ऑपरेशन गंगा’ मोहिमेची पोलखोल केल्याने मोदी सरकारची झोप उडाली आहे. युद्धाचे ढग जमा होत आहेत व मोदींचे दोस्त पुतिनभाई ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत याचे आकलन व्हायला आपल्या परराष्ट्र मंत्रालयास इतका का उशीर व्हावा, असा टोला शिवसेनेने (Shivsena) लगावला आहे.
हिंदुस्थानचे विद्यार्थी युक्रेनमधील सुमी, किव, खार्किव येथे आक्रोश करत होते तेव्हा आपले पंतप्रधान वाराणसीच्या प्रचार सभेत गंगाकिनारी डमरू वाजवत होते. हेच जर कोणाला ‘ऑपरेशन गंगा’ वाटले असेल तर तुम्हाला कोपरापासून साष्टांग दंडवत, अशी खोचक टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून (Saamana) करण्यात आली आहे.
दरम्यान, युद्ध रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू आहे, पण झळा आणि कळा जगाला बसत आहेत. पुतिन वॉररूममध्ये आहेत. युक्रेनचे झेलेन्स्की प्रत्यक्ष युद्धभूमीवर आहेत तर हिंदुस्थानचे पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) हे उत्तर प्रदेशच्या निवडणूक प्रचारात अडकले आहेत, अशी घणाघाती टीका देखील शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
थोडक्यात बातम्या-
Gold Rate: सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ, वाचा ताजे दर
मोदी सरकारचा नागरिकांना धक्का, या गरजेच्या वस्तूंवरील GST वाढणार?
‘..तोपर्यंत हे युद्ध सुरूच राहिल’, पुतिन यांचा युक्रेनला थेट इशारा
“…म्हणून शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर राग आहे”
“राज्यपालांना इथून हटवणं एका मिनिटाचं काम आहे”
Comments are closed.