Top News महाराष्ट्र मुंबई

स्वातंत्र्य चळवळीत भाजप किंवा तेव्हाच्या ‘संघ’ परिवाराचे योगदान काय?- शिवसेना

Loading...

मुंबई | वीर सावरकरांचे स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान होतेच, पण स्वातंत्र्य चळवळीत भाजप किंवा तेव्हाचा ‘संघ’ परिवार कोठे होता? 1947 साली स्वातंत्र्यदिनही संघाने मानला नाही व राष्ट्रध्वज तिरंगा संघ मुख्यालयावर फडकवला नाही, असं म्हणत शिवसेनेनं आजच्या सामना अग्रलेखातून भाजप आणि आरएसएसवर बोचरी टीका केली आहे.

काही ठिकाणी तिरंग्याचा घोर अपमान करण्याचा प्रयत्न झाला हे सर्व इतिहासात नोंदले गेले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सरदार पटेल यांनी दोन वेळा बंदी आणली. दोन्ही वेळेला ‘बंदी’ उठवताना सरदारांनी एक अट कायम ठेवली ती म्हणजे, ”तिरंगा ध्वज राष्ट्रध्वज आहे. तो मानावाच लागेल, असं अग्रलेखात म्हणण्यात आलं आहे.

पटेलांची अट गोळवलकर गुरुजींनी मान्य केली, पण 2002 पर्यंत संघाने हा शब्द पाळला नाही, असे ‘रेकॉर्ड’ सांगतेय. राष्ट्रध्वजाचा अपमान करणारे देशद्रोही ठरवले जातात. स्वतःस राष्ट्रवादी म्हणवून घेणाऱ्या संघटना 2002 पर्यंत ‘राष्ट्रध्वज’ फडकवायला तयार नव्हत्या, अशा शब्दांत शिवसेनेनं सुनावलं आहे.

भगवा ध्वज हे शिवसेनेचेही प्रतीक आहे, पण भगव्याच्या बरोबरीने ‘तिरंगा’ही फडकवला जातो हा आपला राष्ट्रवाद आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांची ‘ढाल’ करून भाजप हे नवराष्ट्रवादाचे राजकारण खेळते आहे, अशी कडवट टीका सामनातून करण्यात आली आहे.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

मी मरेन पण तुम्हाला रोज माझ्या वाक्यांची आठवण होणार- इंदोरीकर महाराज

शाळेची फी भरायलाही पैसे नव्हते; आता झाला देशातील सर्वात तरूण IPS अधिकारी

महत्वाच्या बातम्या-

“वारिस पठाणांच्या वक्तव्यामुळे दिल्ली पेटली”

अनिल काकोडकरांपेक्षा वर्षा गायकवाड बुध्दीमान आहेत का?; विनोद तावडेंची टीका

ठाकरे सरकारचा भाजपला पुन्हा धक्का; भाजपच्या बड्या नेत्याची नियुक्ती रद्द

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या