Top News

“शरद पवारांना ‘जाणता राजा’ कसे म्हणता? हा प्रश्न मोदींनाच विचारा”

मुंबई | ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’  या पुस्तकावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. यावर शिवसेनेनं सामना अग्रलेखातून भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. शरद पवारांना ‘जाणता राजा’ कसे म्हणता? हा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच विचारायला हवा, असं सेनेनं म्हटलं आहे.

छत्रपती शिवरायांना जनतेचा राजा असं संबोधलं जातं. जनतेच्या प्रश्नांबाबत आणि भावनांबाबत खडांखडा माहिती असलेला लोकनेता म्हणजे जाणता राजा हे शरद पवारांच्या बाबतीत नरेंद्र मोदी यांनीच स्वीकारलं आहे, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

सुधीर मुनगंटीवार यांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर नरेंद्र मोदीच देतील. शरद पवार जाणता राजे कसे?, मुनगंटीवार यांनी केलेल्या बालबोध प्रश्नांने पुस्तकावरुन भडकलेल्या वादाची आग कमी होणार नाही, असं म्हणत अग्रलेखातून निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रात संतापाची लाट उठल्यावर भाजपवाल्यांनी नमते घेतले आहे. त्यामुळे वादावर पडदा पडला असून पुन्हा कुणी जुनी मढी उकरुन काढणार नाही हीच अपेक्षा, असंही अग्रलेखात म्हणण्यात आलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक यांची कामगारांना मारहाण

“महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही आणि ती कुणी करूही शकत नाही”

… म्हणून मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी दिल्या रोहित पवारांना शुभेच्छा

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या