Top News महाराष्ट्र मुंबई

…नाहीतर पेकाटात नक्कीच लाथ बसेल; ‘सामना’तून भाजपवर टीकास्त्र

मुंबई | स्वातंत्र्यवीर सावरकरांची ‘ढाल’ करून भाजप हे नवराष्ट्रवादाचे राजकारण खेळते आहे. त्यामुळे शिवसेनेसमोर ‘पेच’ निर्माण होईल असे त्यांना वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. शिवसेनेसमोर ‘पेच’ निर्माण होणार नाही, पण तुम्ही जे ढोंग उभे केले आहे त्या ढोंगाच्या पेकाटात मात्र नक्कीच लाथ बसेल, असं म्हणत शिवसेनेनं सामना अग्रलेखातून भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

वीर सावरकरांच्या विषयावर सरकारची कोंडी करू, असे भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील मंडळींनी जाहीर केले. याचा अर्थ स्पष्ट आहे. सावरकर हा भाजपसाठी आदर किंवा श्रद्धेचा विषय राहिला नसून फक्त राजकारणाचा विषय बनला आहे, अशी टीका शिवसेनेनं केली आहे.

सावरकरांच्या स्मृतिदिनी त्यांचे पुण्यस्मरण सगळय़ांनीच केले. त्यांच्या स्मरणाचे ढोंग आज जे करीत आहेत त्यांना सावरकर खरेच कळले काय? भाजप म्हणते वीर सावरकरांच्या विषयावर कोंडी करू. जे स्वतःच कोंडीत सापडले आहेत त्यांनी दुसऱ्यांची कोंडी करण्याची भाषा करू नये, असा टोलाही शिवसेनेनं लगावला आहे.

भाजपला वीर सावरकरांचा आलेला पुळका खोटा आहे. वीर सावरकर हे भाषाप्रभूसुद्धा होते. मराठी भाषेत ‘शुद्धी’चे प्रयोग त्यांनी केले. आजच्या मराठी भाषादिनी वीर सावरकरांचे स्मरण करूया!, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

मराठी भाषा खऱ्या अर्थाने शक्ती आणि भक्तीची- मुख्यमंत्री

राज्यात पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा; विधेयक मंजूर

महत्वाच्या बातम्या-

मी मरेन पण तुम्हाला रोज माझ्या वाक्यांची आठवण होणार- इंदोरीकर महाराज

“आम आदमी पक्षाला अमित शहांनी विकत घेतलंय का?”

शाळेची फी भरायलाही पैसे नव्हते; आता झाला देशातील सर्वात तरूण IPS अधिकारी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या