मुंबई | राम मंदिर उभारणीच्या श्रेय वादात शिवसेनेला पडायचं नाही. श्रेय तुम्हीच घ्या, पण एकदाचा प्रभू श्रीरामाचा वनवास संपवा, असं आवाहन सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं केलं आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेने घेतलेल्या भूमिकेवरही शिवसेनेनं टीका केली आहे. राममंदिराचा विषय हिंदूत्ववादी संघटनांनीच गुंडाळून ठेलल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे.
राम मंदिराचे निवडणुकीनंतर पाहू असं म्हणणे म्हणजे शरयूत ज्यांनी बलीदान दिले त्यांचे बलीदान विसरण्यासारखं आहे, असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
2019 च्या निवडणुकीत राम मंदिराचा मुद्दा मोदी सरकारला अडचणीचा ठरू नये. म्हणून संघ परिवाराने ही भूमिका घेतली आहे का?, असा सवालही करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-चंद्रकांत पाटलांच्या विरोधात ‘हे’ माजी आमदार निवडणुकीच्या रिंगणात!
–PMO च्या ‘त्या’ ट्विटमुळं जितेंद्र आव्हाडांचा पहिल्यांदा बसला PMOच्या म्हणण्यावर विश्वास
–लोकसभेत राजकीय वातावरण तापलं तर बर्फाच्या वर्षावाने ‘दिल्ली’ गारठली!
–तुमची 55 वर्षे आणि माझे 55 महिने करा तुलना, पंतप्रधान मोदींचं काँग्रेसला आव्हान
–काँग्रेसला अंहकारामुळं 400 जागांवरून 40 वर यावं लागलं- नरेंद्र मोदी