महाराष्ट्र मुंबई

पश्चिम बंगालमधील राजकीय युद्ध नव्या अराजकतेची ठिणगी- उद्धव ठाकरे

मुंबई |  पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या राजकीय वादावरुन शिवसेनेनं सामना अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पश्चिम बंगालमध्ये जे राजकीय युद्ध पेटले आहे ती नव्या अराजकतेची ठिणगी असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे.

कोलकात्यातील दंगल आणि सर्वघटनाक्रमाकडे नरेंद्र मोदींनी पंतप्रधान म्हणून पाहावं. मोदी हे आधी पंतप्रधान आहेत नंतर भाजपचे नेते आहेत, असा सल्ला मोदींना देण्यात आला आहे.

देशात अशांतता आणि भयाचे वातावरण निर्माण होणे हे लोकशाहीला मारक असल्याचंही सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

प. बंगालमधील हे नाट्य धक्कादायक असून केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा हा सामना नसून मोदी विरुद्ध ममता असा हा सामना आहे, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“पूनमताई, प्रमोद महाजनांवर प्रविणने गोळ्या का झाडल्या हे सांगायला लावू नका”

… म्हणूनच भाजपचा हा सगळा डाव आहे- उद्धव ठाकरे

-राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद; चार युवक जिल्हाध्यक्षांचे राजीनामे

-जीव गेला तरी चालेल, पण तडजोड करणार नाही- ममता बॅनर्जी

निधी आणल्याच्या थापा कशाला मारता?; पंकजा मुंडेंकडून विरोधकांचा समाचार

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या