…ही तर आर्थिक दहशतवादाची सुरुवात; सामनातून RBI गव्हर्नर वादावर हल्लाबोल

…ही तर आर्थिक दहशतवादाची सुरुवात; सामनातून RBI गव्हर्नर वादावर हल्लाबोल

मुंबई | सरकारला सत्य सांगणारे लोक नकोत व होयबा हवेत. त्यामुळेच शक्तिकांत दास यांची आरबीआयच्या गव्हर्नर पदी नेमणूक झाली असेल, तर ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात आहे, अशी टीका सामना संपादकीयातून शिवसेनेनं मोदी सरकारवर केली आहे.

भाजप खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी शक्तिकांत दास यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत, तरीही अशा व्यक्तीला देशाच्या सर्वोच्च आर्थिक शिखरावर बसवणं धोक्याचं आहे, असंही संपादकीयात म्हटलं आहे.

दास हे अर्थशास्त्राचे अभ्यासक नाहीत. ते मोदींच्या प्रत्येक निर्णयावर टाळ्या वाजवून समर्थन करणारे म्हणून ओळखले जातात, असं त्यात म्हटलं आहे.

दरम्यान, दास यांची नेमणूक रिझर्व बँकेतील ‘गंमत’ आणि अर्थव्यवस्थेशी ‘खेळ’ व्हायला नको, असं शिवसेनेनं म्हटलं आहे 

महत्वाच्या बातम्या –

-रामदास कदम म्हणजे उद्धव ठाकरेंनी पाळलेलं कुत्रं- नितेश राणे

-“पंतप्रधान मोदींमुळेच काश्मीर खोऱ्यात हिंसाचार वाढला”

-काँग्रेससोबत बोलणी करण्याची अजूनही इच्छा- प्रकाश आंबेडकर

-DySP सुरज गुरव माझ्या मुलाच्या वयाचे, त्यांना माफ करुया!

-नरेंद्र मोदींना सर्वोच्च न्यायालयानं क्लीन चीट दिली – रामदास आठवले 

Google+ Linkedin