Top News

त्या फुटकळ लेखकाला भाजपमधून का हाकलून दिलं नाही?; शिवसेनेचा भाजपला सवाल

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच छत्रपती शिवाजी महाराज असं वादग्रस्त पुस्तकावर कारवाई का केली नाही?, पुस्तकामुळे वाद भडकला, लोकांच्या भावनांचा उद्रेक झाला, हे सगळं जाणूनबूजून करणाऱ्या फुटकळ लेखकाला भाजपमधून का हाकलून दिलं नाही, असा सवाल शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून केला आहे.

लेखकाला भाजपातून हाकलण्यावेळी तुमचे व्यक्तीस्वातंत्र्य, अभिव्यक्तीस्वातंत्र्य आडवे येतं पण जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांची डोकी फोडली जातात, असंही सामनामध्ये म्हटलं आहे.

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ हे पुस्तक वादाचा मुद्दा आहे. महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी लाजत मुरडत निषेध केला. त्यांनी तसा निषेध केला नसता तर त्यांची अवस्था बिकट झाली असती, असं म्हणत भाजपला चांगलाच टोला लगावला आहे.

दरम्यान, भाजपकडून प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकावरुन राजकीय वर्तुळात चांगलाच वाद उफाळलेला आहे. भाजपने नमत घेत पुस्तकावर बंदी घालण्याचे आदेश दिलेत. पुस्तकाच्या लेखकांनी पुस्तकातील मजकूर बदलणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आता हा वाद मिटण्याच्या मार्गावर आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या