मुंबई | अल-कायदा व यल्गार छाप विचारवंतांची कार्यशैली एकच आहे. व्यवस्थेचे मनोधैर्ख खच्ची करून तिला पांगळे बनवायचे, हीच यांची निती आहे, अशा शब्दात आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि विचारवंत आनंद तेलतुंबडे यांच्यावर जोरदार टीकेचे ‘बाण’ सोडण्यात आले आहेत.
तेलतुंबडे हे आंतरराष्ट्रीय किर्तीचे दलित विचारवंत आहेत असे ढोल पिटण्यात आले, पण विचारवंताना जात, धर्म, पंथाची उपाधी लावू नये.
सामुदायिक हत्याकांड, भ्रष्टाचार, हत्या अशा आरोपांतूनही गुन्हेगार सुटतात, मात्र म्हणून ते निर्दोष असतातच असे नाही. प्रा. तेलतुंबडे यांच्यासाठी छाती पिटणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे, अशी जोरदार टीका तुलतुंबडे यांच्यावर करण्यात आली आहेत.
कोरेगाव भीमा दंगल प्रकरणात प्रकाश आंबेडकर आगीत तेल ओतून भडकावण्याचा प्रयत्न का करित होते? त्यांना त्यातून काय साधायचं होतं?, असे प्रश्न विचारून प्रकाश आंबेडकरांवर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
–नाशिकच्या तरुणांनी बनवली अनोखी स्पोर्टस कार; भारतातले पहिलेच डिझाईन
-काँग्रेसला मोठा धक्का; माजी मंत्र्याचा भाजपमध्ये प्रवेश
-एकनाथ खडसेंची बदनामी केल्याप्रकरणी न्यायालयाचा ‘यांना’ मोठा दणका!
-महात्मा गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडणाऱ्या माथेफिरु पूजा पांडेला अटक
-नगर लोकसभा जागेचं गणित काही जुळेना! राष्ट्रवादीचा प्रबळ दावा, विखे पाटील बंड करणार?