Top News महाराष्ट्र मुंबई

‘…तर मोदी आज आहेत त्यापेक्षा मोठे होतील’; शिवसेनेचा मोदींना सल्ला

मुंबई | दिल्लीत चालू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवसेनेने मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून सल्ला दिला आहे.

कृषी कायदे रद्द करून शेतकऱ्यांचे मन राखावं आणि शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्याव्यात. तर मग मोदी आज आहेत त्यापेक्षा मोठे होतील, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयास पुढे करुन शेतकऱ्यांचे आंदोलन संपवण्याचा प्रयत्न करत आहे. एकदा सिंघू बॉर्डरवरील शेतकरी आपापल्या घरी परतला की, सरकार कृषी कायद्यावरची स्थगिती उठवून शेतकऱ्यांची नाकेबंदी करेल. मात्र शेतकरी बांधवांनी हा प्रयत्न उधळून लावला असल्याचं अग्रलेखात सांगितलं आहे.

दरम्यान, स्वातंत्र्योत्तर काळात भारतात इतके कठोर आणि शिस्तबद्ध आंदोलन झाले नव्हते. पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांच्या या हिंमतीचे आणि जिद्दीचे स्वागत केलं पाहिजे, असंही शिवसेने म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मोदी सरकारने दुसऱ्यांचे खांदे भाड्याने घेऊन शेतकऱ्यांवर बंदुका चालवू नयेत”

‘तुम्हाला मला काही द्यायचं असेल तर….’; रतन टाटांनी आपल्या कामगारांकडे व्यक्त केली ‘ही’ इच्छा

हिंदू महासभेने सुरू केलेली गोडसे ज्ञानशाळा दोन दिवसांतच बंद, प्रशासनाने ठोकले टाळे

सरपंचपदाचा लिलाव करणाऱ्या ‘या’ गावांना निवडणूक आयोगाचा झटका

ड्रग्ज प्रकरणी नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना एनसीबीकडून अटक!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या