बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तरुणाने भररस्त्यात फ्रान्सच्या अध्यक्षांच्या श्रीमुखात मारली, जनतेच्या संयमाचा कडेलोट होऊ देऊ नका”

मुंबई | फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांना त्यांच्या देशातील तरुणाने भररस्त्यात एकच श्रीमुखात लगावली. कोरोना संकटात सर्वस्व गमावल्याचा आणि फ्रान्समध्ये लसीकरणाचा बोजवारा उडाल्याचा राग त्याच्या मनात उफाळून आला आणि त्याने हे कृत्य केलं. या कृत्याचा निषेधच व्हायला हवा, पण जनतेच्या संयमाचा कडेलोट होणार नाही याची काळजी राज्यकर्त्यांनीही घ्यायला हवी. मॅक्रॉन यांच्याबाबत जे घडलं त्याचा हाच संदेश आहे, असं शिवसेनेनं आजच्या सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

फ्रान्स हा लोकशाहीप्रधान देश आहे. संसदीय लोकशाहीस तेथे मोलाचं स्थान आहे. मॅक्रॉन हे निवडणुकीत विजयी होऊन राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले. मॅक्रॉन हे कुणाला आवडत नसतील तर त्यांच्यावर टीका होऊ शकते, पण देशाच्या अध्यक्षांवर हल्ला करून लोकशाहीचा गळा आवळण्याचा हा प्रकार आहे. यापूर्वी अनेक देशांत अनेक राज्यकर्त्यांनीही अशा श्रीमुखातील भेटी स्वीकारल्या आहेत, असं शिवसनेनं अग्रलेखात म्हटलंय.

कडेकोट सुरक्षाव्यवस्था असतानाही असे माथेफिरू चार पावले पुढेच असतात. त्यामानाने फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना फक्त श्रीमुखातच पडली. प्राणावर बेतले नाही, पण गालावर निभावले. पण मॅक्रॉन यांचे गालफट रंगवण्याचे कारण काय? तो माथेफिरू असा का भडकला? त्या माथेफिरूने आधी मॅक्रॉन यांच्या गालावर रंग का चढवला ते समजून घेतलं पाहिजे, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

दरम्यान, अनेक राज्यकर्त्यांना प्राण गमवावे लागले. आपल्याच देशात इंदिरा गांधी, राजीव गांधी, बियांत सिंग, इतकंच काय, जनरल अरुण कुमार वैद्य यांच्यासारख्या सेनानींना भररस्त्यात हल्लेखोरांकडून प्राणघातक हल्ल्यांना सामोरे जावे लागलं व यापैकी अनेकांना प्राण गमवावे लागले. अलीकडे प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरील हल्ला झाला, पण तो हल्ला पायावर निभावला. महात्मा गांधींची हत्या तर सार्वजनिक ठिकाणीच झाली. लिबियाचे राष्ट्राध्यक्ष गड्डाफी यांना तर संतप्त लोकांनी भररस्त्यात ठार मारलं. अमेरिकेचे राष्ट्रपती केनेडी यांनाही माथेफिरूने ठार केले, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

राज्यातील ‘या’ जिल्ह्याला रेड अलर्ट जारी; पुढील 24 तास पाऊस झोडपून काढणार

मुंबईतील मालाड भागात चार मजली इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना, 9 जणांचा मृत्यू, 8 जण गंभीर

‘या’ प्रसिद्ध क्रिकेटरची सेक्स टेप लीक, हॉटेलमध्ये बनवलेल्या या अभिनेत्रीसोबतचा व्हिडीओ लीक

जॉगिंग किंवा मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडताना मास्क वापरणं योग्य की अयोग्य?, जाणून घ्या!

बाप रे! पावसाच्या भयंकर रूपाने वाहतुकीचा महाराष्ट्रातील हा पूल लोकांच्या डोळ्यासमोर गेला वाहून

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More