बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मोदींच्या सभेत काळ्या टोप्या आणि काळे मास्क उतरवण्यात आले, कलियुग म्हणतात ते हेच का?”

मुंबई | पंतप्रधान मोदींच्या वाराणसीतील सभेत काळ्या टोप्या आणि काळे मास्क सुरक्षा यंत्रणांनी लोकांना उतरवायला सांगितले. दुसरीकडे अमित शहा यांच्या एका दौऱ्यात सुरक्षा यंत्रणांनी लोकांना घरांच्या दारे, खिडक्या बंद ठेवायला सांगितल्या. यावरुन हे भीतीचेच लक्षण नाही का?, असा सवाल करत कलियुग म्हणतात ते हेच का?, अशी विचारणा सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

काळे मास्क काढण्याचे कारण काय? तर पंतप्रधानांची सुरक्षा! जगभरात दोन रंगांचेच मास्क जोरात चालले आहेत. आपल्या देशात पंतप्रधानांच्या सभांना यापुढे ‘काळे’ मास्क चालणार नाहीत, असा अप्रत्यक्ष आदेश पंतप्रधानांच्या सुरक्षा यंत्रणांनी दिला आहे, असं शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलंय.

वाराणसीच्या या सोहळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोकही त्यांच्या गणवेषात मोठ्या कौतुकाने हजर होते. त्या स्वयंसेवकांच्या डोक्यावरच्या काळ्या टोप्याही सुरक्षा रक्षकांनी काढायला लावल्या. आता सुरक्षा रक्षकांनी संघाची काळी टोपी काढली. ऐकावे ते नवलच असा हा प्रकार आहे, असं अग्रलेखात म्हटलंय.

मास्कच्या आड आणि काळय़ा टोपीखाली दडलंय काय, असा प्रश्न पंतप्रधानांच्या सुरक्षा यंत्रणेस पडला असावा. हे सर्व उपद्व्याप करण्याआधी सरकारने एकच करावे, एक अध्यादेश काढून काळे मास्क व काळ्या टोप्या यावर बंदीच घालावी. नाही तरी देशद्रोहाचा कायदा आपल्या देशात स्वस्त झालाच आहे, अशी बोचरी टीका अग्रलेखातून केंद्र सरकारवर करण्यात आली.

थोडक्यात बातम्या- 

हर्षवर्धन पाटलांच्या चुलत भावाचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश!

“स्वप्नीलच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांना भेटायला जावं लागलं, हे निबर कातडीचं सरकार”

‘ही’ अभिनेत्री लवकरच करणार कमबॅक; दाऊदसोबतच्या संबंधांमुळे आली होती चर्चेत

संजय राठोडांच्या क्लीन चिटवर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

अथिया-राहुलच्या नात्यावर सुनील शेट्टीनं दिली प्रतिक्रिया, म्हणाला…

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More