“महाराष्ट्रातलं सरकार आपण घालवू या फाजील विश्वासावर विरोधी पक्ष जगतोय”
मुंबई | राज्यपालांनी 12 सदस्यांची फाईल मंजूर न करणं यामागे राजकारण आहे आणि फाईल दाबून ठेवा, असा वरचा हुकूम आहे. महाराष्ट्रातलं सध्याचं सरकार आपण घालवू या फाजील विश्वासावर विरोधी पक्ष जगत आहे, पण हा विश्वास म्हणजे ‘ऑक्सिजन’ नसून कार्बन डाय ऑक्साईड आहे. विषारी वायू आहे. या खटपटीत गुदमरून तडफडाल हा धोक्याचा इशारा आम्ही देत आहोत, असं शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्त्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रखडवल्या आहेत. यावरून शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.
मोडतोड तांबा-पितळ मार्गाचा अवलंब करून जुगाड करता आले तर त्या जुगाड योजनेत सहभागी होणाऱ्यांवर खिरापतीसाठी या 12 आमदारकीचे तुकडे फेकता येतील, असे हे ‘स्वच्छ भारत अभियान’ आहे आणि त्या योजनेंतर्गत 12 आमदारांच्या नियुक्त्या रखडवून ठेवल्या आहेत. पण ही जुगाड योजना अमलात येण्याचे स्वप्न साकार होण्याची शक्यता नाही, असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय.
महाराष्ट्राच्या संयमाचा बांध फुटेल, असं कोणीही वागू नये. महाराष्ट्र पुरोगामी, संयमी आहे म्हणजे तो भेकड आहे असं मानू नये. ज्येष्ठांचा व पाहुण्यांचा आदर करणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे. पण ‘भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळांच्या माथी हाणू काठी’ हेसुद्धा आमचे संतसज्जन आम्हाला सांगून गेले आहेत, असंही शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
कोरोना नसलेल्या लोकांनाही काळ्या बुरशीच्या आजाराचा धोका; तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्वाची माहिती
शहरी भागातील एक तृतीयांश लोकांच्या शरिरात कोरोना अँटीबॉडी; सिरो सर्व्हेतून धक्कादायक माहिती समोर
“राजभवनात भुताटकीचा वावर, एकदा शांतीयज्ञ करून घ्यावा लागेल”
राज्याला मदत मिळवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी केंद्राला पत्र लिहावं- रोहित पवार
Comments are closed.