मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी एम्सने दिलेल्या आहवालावरून शिवसेनेनं अभिनेत्री कंगणा राणावतवर जोरदार टीकास्त्र सोडलंय.
ज्यांनी मागच्या शंभर दिवसांत महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी केली, अशा गुप्तेश्वरी नट्या आणि ‘गुप्तेश्वर’ आता कोणते प्रायश्चित्त घेणार आहेत? असा सवाल शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून उपस्थित केला आहे.
मुंबईला पाकिस्तानची, बाबराची उपमा दिली त्या नटीबाई आता कोणत्या बिळात लपल्या आहेत? हाथरसमध्ये एका तरुण मुलीवर बलात्कार करून मारले, तेथील पोलिसांनी त्या मुलीचा देह विटंबना करून काळोखात जाळला याबद्दल त्या नटीने डोळ्यात ग्लिसरीन घालूनसुद्धा दोन अश्रू ढाळले नाहीत, अशी बोचरी टीका शिवसेनेनं कंगणावर केलीये.
महत्वाच्या बातम्या-
“3 महिन्याच्या चिमुकलीवर बलात्कार केला जातो, ती देखील असंस्कारी आहे का?”
“माझ्याजवळ गिरीश महाजनांची अनेक गुपितं, त्यामुळे मला ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत”
‘किसी का दर्द मिल सके तो ले उधार…’; शशी थरूर यांचा भाजपला टोला
नोएडा पोलिसांनी प्रियांका गांधी यांची माफी मागितली, म्हणाले…