बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अच्छे दिन, स्वर्ग दूरच राहिला, पण नरक तो हाच काय?”

मुंबई | देशात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. कुठे लोकांना उपचारासाठी बेड मिळत नाहीये तर काहींना स्मशानात अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा. यावरून शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकावर सडकून टीका केली आहे.

मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांना देशाचा स्वर्गच बनवायचा होता. त्यासाठीच त्यांनी मते मागितली, पण आता देशाचे स्मशान आणि कब्रस्तान होताना दिसत आहे. कोठे सामुदायिक चिता पेटत आहेत, कोठे इस्पितळे स्वतःच रुग्णांसह पेट घेत आहेत! अच्छे दिन, स्वर्ग दूरच राहिला, पण नरक तो हाच काय?, असा सवाल शिवसेनेनं अग्रलेखातून केलाय.

देशात सध्या जो हाहाकार माजला आहे त्याचे खापर राज्यांवर फोडण्याऐवजी केंद्र सरकारच्या धुरिणांनी आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. देशातील आरोग्य यंत्रणेने कोविड 19 च्या संकटाला पराभूत केल्याचा खोटा आभास निर्माण केला, पण दुसरी लाट येणार व ती भयंकर असणार याची सूचना असतानाही केंद्र सरकारने आरोग्य सुविधांच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्यासाठी काय केले? हा प्रश्नच आहे, अशी टीका शिवसेनेनं केली आहे.

गुजरात व उत्तर प्रदेशसारख्या राज्यांत कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या लपवून ठेवण्यात आली. शवागारात मृतदेह लपवून ठेवले तरी नंतर स्मशानात सामुदायिक चिता पेटल्याच. अच्छे दिन आणू असे वचन देणाऱ्यांच्या राज्यात रुग्णांना बेड नाहीत, ऑक्सिजन नाही, लस आणि औषधे नाहीत. फक्त तडफड आणि मनस्ताप आहे, अशा शब्दांत शिवसेनेनं अग्रलेखातून केंद्र सरकारला सुनावलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“…तर घराबाहेर न पडताही तुम्हाला कोरोनाची लागण होऊ शकते”

‘या चोराकडून शिका’; कोरोना लस आणि इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांना जयंत पाटलांचा सल्ला

“राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर आणि ऑक्सिजन ऑडीट करा”

“…तर राजकारणात नरेंद्र मोदींना उद्धव ठाकरेंचा आदर्श ठेवावा लागेल”

प्रसिद्ध लोककलावंत ‘भारुडरत्न’ निरंजन भाकरे यांचं कोरोनाने निधन!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More