Top News

“दानवे म्हणाले ते त्रिवार सत्य, सरकार चालवणं हे येड्यागबाळ्यांचे काम नव्हे”

मुंबई | आपला देश दक्षिण आशियातील तिसरा सर्वात गरीब देश ठरत आहे. कोरोना वगैरे कारणे काहीही असतील. मग बांगलादेशला ती कारणे का नाहीत? याचं उत्तर भाजपचे केंद्रीयमंत्री दानवे यांनी दिलं आहे. राज्य करणं हे येड्यागबाळ्यांचं काम नव्हे! देश येड्यागबाळ्यांच्या हाती आहे असेच दानवे यांना म्हणायचे आहे काय?, असा टोला शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारला लगावला आहे.

कुपोषणाच्या बाबतीत पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार या देशांवरही आपण मात केली. हे सर्व का घडतं याचं उत्तर मोदी सरकारातील मंत्री रावसाहेब दानवे यांनी एका झटक्यात देऊन टाकलं. सरकार चालवणं येडय़ागबाळय़ाचं काम नाही हेच त्रिवार सत्य आहे असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

लोकांनी रोजगार गमावला, पण त्या बेरोजगारांच्या हाताला काम देण्याऐवजी सर्जिकल स्ट्राईक, राफेल वगैरे विषय बाजारात आणून चर्चा घडविणे हेच देशातील वाढत्या भूक अराजकाचे लक्षण आहे, असं शिवेनेनं अग्रलेखात म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

…म्हणूनच शरद पवारांना या वयात बांधावर जावं लागतंय- गोपीचंद पडळकर

कमलनाथांची जीभ घसरली; भाजपच्या महिला नेत्याचा आयटम म्हणून केला उल्लेख

3 धावांचं आव्हान! सुपर ओव्हरमध्ये कोलकात्याची हैद्राबादवर मात

राजीनाम्याच्या वृत्तावर एकनाथ खडसेंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या