मुंबई | एकीकडे पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था करण्याचे वादे करायचे आणि दुसरीकडे कर्जबाजारी सरकारी कंपन्या विकून दात कोरून पोट भरण्याचे उद्योग करायचे, असं म्हणत शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर टीका केली आहे.
सुमारे 80 हजार कोटींच्या कर्जाच्या विळख्यात सापडलेली प्रमुख सरकारी विमान कंपनी एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस यांच्या संपूर्ण खासगीकरणाची नवी योजना केंद्र सरकारने जाहीर केली. यावरून शिवसेनेनं सरकारवर निशाणा साधला आहे.
एअर इंडियावर सध्या 80 हजार कोटी एवढय़ा कर्जाचा बोजा आहे. त्यात गेल्या वर्षी सुमारे साडेआठ हजार कोटींच्या तोटय़ाची भर पडली आहे. त्यामुळे एअर इंडिया हे सरकारसाठी जड झालेलं ओझं ठरलेलं आहे का? त्यामुळेच सरकारने एअर इंडियाच्या संपूर्ण खासगीकरणाचा मध्यम मार्ग काढला, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
दरम्यान, एअर इंडियामध्ये काम करणाऱ्या हजारो कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या भवितव्याचा प्रश्न महत्वाचा आहे, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
उदयनराजेंची मारहाण-खंडणी प्रकरणी निर्दोष मुक्तता
लोकसभा निवडणुकीतील राज ठाकरेंचं काम उल्लेखनीय; बाळासाहेब थोरातांचं प्रतिपादन
महत्वाच्या बातम्या-
हातात बूट घेऊन देवेंद्र फडणवीस स्टेजवर, रूपाली चाकणकर म्हणतात…
निवडणुकी आधी जे भाजपत गेले त्या सगळ्यांची वाट लागली- धनंजय मुंडे
“अशोक चव्हाणांच्या ‘त्या’ वक्तव्याचा शब्दशः अर्थ घेऊन चालणार नाही”
Comments are closed.