मुंबई | शिवसेनेनं सामनाच्या आग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणावर सडकून टीका केली आहे. जगाचं राहू द्या साहेब, देशातल्या अर्थव्यवस्थेला धक्का द्या. स्वातंत्र्य दिन येतो आणि जातो, लाल किल्ला तोच आहे, प्रश्न आणि दुःख तेच आहे, अशा शब्दांत शिवसेनेनं मोदींवर निशाणा साधला आहे.
प्रत्येक नागरिकाला डिजिटल हेल्थ कार्ड दिलं जाईल, नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनची स्थापना होईल, असं पंतप्रधानांनी जाहीर केलं. या आरोग्य ओळखपत्रात डॉक्टरांच्या भेटीपासून ते औषधोपचारांपर्यंत सर्व काही असेल. हे सर्व डिजिटल प्रकरण छानच असावं पण आजच्या कोरोना महामारीने देशासमोर जे आर्थिक महासंकट उभं राहिलं आहे त्याचं काय?, असा सवाल शिवसेनेनं मोदींना केला आहे.
देशात आतापर्यंत 14 कोटी लोकांनी रोजगार गमावला आहे. भविष्यात हा आकडा वाढेल. लोकांना घराबाहेर पडायचं आहे. पण घराबाहेर पडून काय करायचं? नोकरीधंदा, रोजगार गेला आहे. त्यांच्या भविष्यावर पंतप्रधानांनी भाष्य केलं असतं तर बरं झालं असतं, असा टोला शिवसेनेनं मोदींना लगावला आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी सांगितलेल्या तीन लसी जोपर्यंत बाजारात येत नाहीत तोपर्यंत देशातील भय संपणार नाही, असं अग्रलेखात म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या-
कोरोनाच्या भीतीने खांदा द्यायला देखील कुणी आलं नाही; पोरांनी बापाचा मृतदेह सायकलवरुन स्मशानात नेला
‘सिल्व्हर ओक’वरील पाच जणांना कोरोनाची लागण
सोनू सूदने दिलेला शब्द पाळला; पुण्याच्या ‘वॉरीयर आजी’चं ते स्वप्न लवकरच सत्यात उतरवणार
मठात 15 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; बीड जिल्ह्यातील धक्कादायक घटना
उत्तर प्रदेशात मुलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या; शेतात सापडला मृतदेह