बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“खलिस्तानी म्हटलं, बदनाम केलं गेलं, सरकारनं आडमुठेपणा केला म्हणून…”

मुंबई | मागील 1 वर्षापासून सुरु असलेलं शेतकरी आंदोलन  (Delhi Border Farmers Protest) अखेर शेतकऱ्यांनी मागे घेतलं आहे. शेतकऱ्यांनी ठेवलेल्या  अटी सरकारने मान्य केल्यानंतर शेतकऱ्यांनी अखेर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता शिवसेनेने  मोदी सरकारने शेतकऱ्यांनी दिलेली सर्व आश्वासन पाळली नसल्याचं म्हणत मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

शिवसेनेनं सामना अग्रलेखातून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सामनामध्ये म्हटलं आहे, शेतजमनीचे कंत्राटीकरण, बाजार समित्या, मंड्यावर उद्योगपतींचे वर्चस्व आणणारे तीन कायदे शेतकऱ्यांनी झुगारून लावले. मोदी सरकारने तर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आधीच मूर्ख ठरवले होते. सरकारने शेतकऱ्यांना खलिस्तानी अतिरेकी ठरवून बदनाम केले, असा आरोप शिवसेनेनं केला आहे.

याशिवाय शिवसेनेनं पुन्हा एखादं निवडणुकांमधील पराभवाच्या भीतीने केंद्र सरकारने माघार घेतल्याचाही आरोप केला आहे. सामनामध्ये म्हटलं आहे, सरकारने आधी आडमुठेपणा केला त्यामागे उद्योगपतीचं हित होतं. मात्र, आता पंजाब, उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये पराभव होईल, या भीतीने लगेच सरकारने माघार घेतली, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

दरम्यान, संयुक्त किसान मोर्चाकडून (Samyukta Kisan Morcha) आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. आंदोलन ठिकाणाहून सर्व शेतकरी 11 डिसेंबरपर्यंत म्हणजे आज घरी परतणार असल्याचं शेतकरी नेते दर्शन पाल सिंग यांनी सांगितलं आहे. शेतकऱ्यांकडून आंदोलन मागे घेत असल्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी देखील 15 जानेवारीला आढावा बैठक घेण्यात येणार आहे.

थोडक्यात बातम्या-

Omicron ला रोखण्यासाठी बुस्टर डोसची गरज? अहवालातून आली ‘ही’ महत्त्वाची माहिती समोर

Omicron | राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू

“महाराष्ट्रातील मुस्लीम तिरंगा हातात घेऊ शकत नाही का?”

फिरसे मौका मौका! भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार, ‘या’ तारखेला होणार सामना

“दादा बघा, दादा बघा…अरे दादाला इथली अंडी पिल्लं माहितीये”, अजित पवारांची टोलेबाजी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More