Loading...

“महाराष्ट्र ही काही जुगारावर लावण्याची चीज नाही”

मुंबई | जुगारात बनावट पत्ते फेकून डाव जिंकण्याचे प्रयत्न आतापर्यंत सफल झालेले नाहीत आणि महाराष्ट्र ही काही जुगारावर लावण्याची ‘चीज’ नाही. सरकारे येतील, सरकारे जातील; पण अन्याय आणि ढोंगाशी लढण्याची महाराष्ट्राची प्रेरणा अजिंक्य आहे, अशा शब्दात शिवसेनेनं आजच्या सामानाच्या अग्रलेखातून भाजपवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

महाराष्ट्राने कधी कुणाच्या पाठीत वार केले नाहीत. अफझल खानाचा कोथळाही समोरून काढला आहे. निखाऱ्यावरून चालणारे आम्ही आहोत. हा निखारा म्हणजे विझलेला कोळसा नाही, असंही आजच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

Loading...

राष्ट्रपती राजवट लादली म्हणजे महाराष्ट्रातील सत्ता परिवारातच राहिली. त्यामुळे मावळलेल्या सरकारची पिल्ले खूश आहेत हे त्यांच्या आनंदी चेहऱ्यावरून दिसत आहे, असं म्हणत शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, निखाऱ्याशी खेळू नकाच, पण कोळसा म्हणून हाती निखारा घ्याल तर चटकेही बसतील व तोंडही काळे करून घ्याल, असा इशाराही शिवसेनेनं दिला आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या- 

 

 

Loading...

 

 

Loading...