मलबार हिलचं नाव बदलण्याची शिवसेनेची मागणी, हे नाव सुचवलं!

प्राचीन काळात सीतेच्या शोधात निघालेले प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण काही काळ या भागात वास्तव्याला होते. त्यामुळे मलबार हिलचं नाव राम नगरी करा- दिलीप लांडे

मुंबई | उत्तर प्रदेशमध्ये सुरु झालेलं नावं बदलण्याचं फॅड आता मुंबईत पोहोचलं आहे. शिवसेनेनं मुंबईतील मलबार हिल परिसराचं नाव बदलण्याची घोषणा केली आहे. 

मनसेतून शिवसेनेत दाखल झालेले नगरसेवक दिलीप लांडे यांनी ही मागणी केली आहे. तसेच त्यांनी मलबार हिलला पर्यायी रामनगरी नाव सुचवलं आहे. 

महापालिकेच्या महासभेपुढे यासंदर्भात प्रस्ताव देखील मांडण्यात आला आहे. त्यामुळे महासभा काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 

प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण यांचं काही काळ या भागात वास्तव्य होतं, असं सांगितलं जातं. त्यामुळे दिलीप लांडे यांनी राम नगरी हे नाव सुचवलं आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-लग्नानंतर प्रियांकानं नाव बदललं, पाहा काय आहे नवीन नाव…

-रस्ते नीट दिसले नाहीत तर काॅन्ट्रॅक्टरवर बुलडोजर चालवेन- गडकरी

-होय, भाजपने गरज पडेल तसा माझा वापर करुन घेतला- एकनाथ खडसे

-जगाला हेवा वाटावा असा विक्रम पाकिस्तानी गोलंदाजाच्या नावावर!

-‘वसुंधरा राजे खूप जाड झाल्या आहेत, त्यांना आराम द्या’ वक्तव्यावर शरद यादवांच स्पष्टीकरण