बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेना दत्तात्रेय भरणेंवर नाराज?, ‘या’ नेत्यानं मागितला राजीनामा

पिंपरी-चिंचवड | राष्ट्रवादीचे नेते आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. दत्तात्रेय भरणे यांना आपल्या वक्तव्याबद्दल जरा देखील खेद असेल तर त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी थेट मागणी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

नीलम गोऱ्हे पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होत्या, यावेळी त्यांना दत्तात्रेय भरणे यांच्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. माणसाची बुद्धी आणि मन जागेवर नसलं की मनी वसे ते स्वप्नी दिसे तसं ते तोंडातून बाहेर येतं, असं दत्ता भरणे यांचं झालं आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली ते मंत्री म्हणून काम करत आहेत, त्यांच्या विषयी जर कुणी असं बोलत असेल तर ते अत्यंत अयोग्य आहे, असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेमध्ये सध्या दत्तात्रेय भरणे यांच्या वक्तव्याचे चांगलेच पडसाद उमटत आहेत. त्यातच नीलम गोऱ्हे यांनी थेट दत्तात्रेय भरणे यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, 15 ऑगस्टच्या निमित्ताने सोलापूर महापालिकेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात भाषण करताना दत्तात्रेय भरणे यांनी मुख्यमंत्र्यांसंदर्भात वक्तव्य केलं होतं. मुख्यमंत्र्यांचं जाऊ द्या, मरू द्या, आपण आपलं करूया ना. मुख्यमंत्र्यांकडून मोठा निधी घ्यायचा आहे, असं भरणे म्हणाले होते. त्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त करणारा व्हिडीओ पोस्ट केला होता.

थोडक्यात बातम्या-

आमदार देवेंद्र भुयार यांना 3 महिन्यांच्या सक्तमजुरीची शिक्षा

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

भारतीय गोलंदाज ठरले लॉर्ड्सवर ‘बाजीगर’, भारताचा इतक्या धावांनी विजय

शरद पवारांचं अचानक ओबीसींप्रति प्रेम आज उफाळून आलं- गोपीचंद पडळकर

अफगाणिस्तानमध्ये ‘इतके’ भारतीय नागरिक पडलेत अडकून?; समोर आली आकडेवारी!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More