युतीसाठी शिवसेनेनं भाजपसमोर ठेवल्या ‘या’ चार अटी

युतीसाठी शिवसेनेनं भाजपसमोर ठेवल्या ‘या’ चार अटी

मुंबई | युती करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. यावेळी शिवसेनेनं  भाजपसमोर 4 अटी ठेवल्याची माहिती मिळत आहे.

युती झाल्यास पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल, विधानसभेची निवडणूक लोकसभेसोबतच घ्यावी, लोकसभेला सेनेसाठी 25 जागा सोडाव्यात, विधानसभेसाठी 150 जागा सोडाव्यात, अशा 4 स्पष्ट अटी सेनेनं भाजपसमोर ठेवल्या आहेत.

गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने 26 तर शिवसेनेनं 22 जागा लढवल्या होत्या. यात भाजपने 23 तर शिवसेनेनं 18 जागांवर विजय मिळवला होता.

दरम्यान, 16 पैकी 9 मित्रपक्षांनी साथ सोडली असताना भाजप शिवसेनेच्या या कठोर अटी मान्य करेल का हा सवाल आहे.

महत्वाच्या बातम्या-

पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसाट यांचा संशयास्पद मृत्यू

-संजय काकडे आणि अजित पवार यांच्या भेटीने चर्चांना उधान

विराट, रोहित वर्ल्ड कप संघात हवेच, पण धोनी?

-शिवसेनेचा 1995 च्या जागावाटप सूत्राचा प्रस्ताव; अमित शहा-उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा

‘भारतरत्न’ स्वीकारण्यास भूपेन हजारिका कुटुंबीयांचा नकार

Google+ Linkedin