Top News

चंद्राबाबू नायडूंच्या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा; संजय राऊत चंद्राबाबूंना भेटले

नवी दिल्ली | आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी दिल्लीत लाक्षणिक उपोषण केलं, उपोषणस्थळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांची भेट घेत त्यांना पाठिंबा देत असल्याचं म्हटलं आहे. ‘एएनआय’नं याबाबत ट्विट केलं आहे.

चंद्राबाबू नायडू यांच्या उपोषणाच्या ठिकाणी दिवसभरात विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांनी भेट घेतली, मात्र संजय राऊत यांची भेट चर्चेचा विषय ठरली.

चंद्राबाबू नायडू यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानचे पंतप्रधान असल्यासारखं वागतात, अशी टीका केली आहे.

दरम्यान, राहुल गांधी, ममता बॅनर्जी यांच्यासह विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी चंद्राबाबूंची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

“काँग्रेसला सत्तेत आणण्यासाठी जमिनीवर राहून काम करणाऱ्या नेत्यांना बळ द्या”

मुख्यमंत्र्यांना असं बोलणं शोभत नाही- अजित पवार

भाजपच्या ‘कम अगेन मोदीजी’ला राष्ट्रवादीचं व्यंगचित्रातून उत्तर

रोड शो मध्ये ‘चौकीदार चोर है’ च्या घोषणांनी लखनऊ दुमदुमलं!, पाहा व्हीडिओ

“उत्तर प्रदेशात काँग्रेसची सत्ता आणल्याशिवाय शांत बसणार नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या