Top News

शिवसेनेला बिहारमध्ये 23 पैकी 21 जागांवर ‘नोटा’पेक्षाही कमी मतं!

पाटणा | भाजप-जेडीयू यांची एनडीए बिहारमध्ये मुसंडी मारताना दिसत आहे. तर शिवसेनेची कामगिरी समाधानकारक नसल्याचं चित्र आहे. 23 पैकी 21 जागांवर तर शिवसेनेच्या वाट्याला नोटापेक्षाही कमी मतं मिळाली आहेत.

शिवसेनेच्या चिन्हासमोरील बटणापेक्षा मतदारांनी ‘नोटा’चे बटण अधिक दाबले आहे. शिवसेनेच्या उमेदवारांना o.o4 टक्के मतं मिळाल्याचं सुरुवातीच्या मतमोजणीत दिसत होतं.

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार दुपारी 1.45 वाजेपर्यंत आलेल्या निकालाच्या कलांनुसार शिवसेनेला 23 पैकी 21 जागांवर ‘नोटा’पेक्षाही कमी मतं मिळाली आहेत.

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकांचा निकाल अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहेत. बिहार निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“नितीशकुमार यांचं महत्व कमी करण्याचा भाजपचा डाव यशस्वी”

मुंबई पोलिसांच्या समन्सानंतरही मुंबईत हजर राहण्यास कंगणाचा नकार, म्हणाली…

“मंगळावर जाणारे सॅटेलाइट नियंत्रित होऊ शकतात तर ईव्हीएम मशीन का हॅक होऊ शकत नाही?”

“एनडीए आघाडीवर दिसत असली तरी येत्या काही तासांमध्ये हे चित्र पुन्हा पालटू शकतं”

“राहुल गांधी यांनी ज्यांच्यासोबत हात मिळवले ते डुबले”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या