‘आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार’, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
मुंबई | एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल समोर येत यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र, शिंदे गटाकडे जाणाऱ्या आमदारांची संख्या जास्त असल्याचं पाहायला मिळत आहे.
उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतरही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी नाही, या मागणीवर ठाम असल्याचं एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना बंडखोर आमदारांना 24 तासांत परत येण्याचं आवाहन केलं आहे.
शिवसेना महाविकास आघाडीमधून बाहेर पडायला तयार आहे. तुम्ही फक्त समोर येऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा करा, असं मोठं वक्तव्य संजय राऊतांनी केलं आहे. राऊतांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत चांगलीच खळबळ उडालेली पाहायला मिळत आहे.
दरम्यान, संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. दोन्ही पक्षांनी बैठकीला सुरूवात केली असून आता या प्रकरणाला काय वळण लागणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या-
आता पुढं नेमकं काय होणार?, गुवाहाटीतून शिंदे गटातील आमदाराचा मोठा खुलासा
सलग दुसऱ्या दिवशी ‘सामना’तून तोफ धडाडली, पाहा कुणाकुणाला दिलाय इशारा!
उद्धव ठाकरेंवर आणखी मोठी नामुष्की, आता ‘धनुष्यबाण’ही साथ सोडणार?
“आमदार फुटण्यामागे हे कारस्थान…”; संजय राऊतांनी सांगितलं कारण
“उद्धव ठाकरे यांनी आम्हाला रामलल्लाच्या दर्शनाला जाण्यापासून रोखलं”
Comments are closed.