नवी दिल्ली | भाजप नेते किरीट सोमय्या व शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात सध्या कलगीतूरा रंगलेला पाहायला मिळत आहे. संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेना सोमय्यांविरोधात आक्रमक झाली आहे.
शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिल्लीत जाऊन नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना खैरेंनी किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे. किरीट सोमय्यांना राजकारणातील शक्ती कपूर म्हणत खैरे यांनी सोमय्यांवर सडकून टीका केली.
‘सोमय्या यांनी आरोप करावेत, आम्ही त्याच्यावर बोलणार नाहीत. मात्र, मी त्यांना राजकारणातील शक्ती कपूर म्हणतो. त्यांच्याविषयी बोलण्यासारखे यापेक्षा आणखी काही नाही’, अशी टीका चंद्रकांत खैरेंनी किरीट सोमय्यांवर केली आहे.
दरम्यान, राज्यात शिवसेना विरूद्ध भाजप असं चित्र दिसत असताना चंद्रकांत खैरेंनी किरीट सोमय्यांना राजकारणातील खलनायक ठरवले आहे.
थोडक्यात बातम्या-
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, पाहा ताजे दर
भरधाव बाईकची ट्रकला धडक; काळजाचा थरकाप उडवणारा अपघात
“भाजपला दूध दिसत नाही, शेण दिसतं, त्यांचा दृष्टीकोनच तसा आहे”
मेरा यही अंदाज ज़माने को खलता है, संजय राऊतांचं नवं ट्विट चर्चेत
ना परिक्षा ना मुलाखत, पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार ‘इतका’ पगार
Comments are closed.