बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आम्ही म्हणायचं ठाकरे सरकार पण प्रत्यक्षात लाभ घेतं पवार सरकार”

रत्नागिरी | शिवसेना नेते व मुंबईतील खासदार गजानन कीर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी रविवारी एका कार्यक्रमात बोलताना खळबळजनक गौप्यस्फोट केले आहेत. गजानन कीर्तीकर यांच्या खुलास्यांमुळे महाविकास आघाडीतील धुसफुस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

निधी वाटपाबद्दल बोलताना गजानन कीर्तीकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi) जोरदार निशाणा साधला आहे. आम्ही म्हणायचं ठाकरे सरकार पण लाभ घेतं पवार सरकार, असं म्हणत गजानन कीर्तीकर यांनी शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे.

मुंबईमध्ये नगरोत्थान, नगरविकासाचा निधी मिळतो. मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून आम्ही निधी मिळवतो. मात्र, निधीची पळवापळवी केली जात असल्याचा आरोप गजानन कीर्तीकर यांनी केला. आम्ही म्हणायचं ठाकरे सरकार पण प्रत्यक्षात लाभ घेतं पवार सरकार, असा घणाघात कीर्तीकरांनी केला.

दरम्यान, गजानन कीर्तीकर यांनी ठाकरे सरकारविरोधात नाराजी दर्शवली. तर कीर्तीकरांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत सर्वकाही अलबेल नसल्याचं आणखी एकदा स्पष्ट झालं आहे.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! व्लादिमीर पुतिन यांच्या निर्णयाने जगाचं टेंशन वाढलं

‘धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट काढला तर तो…’,करूणा शर्मांचं खळबळजनक वक्तव्य

Corona Update: आज राज्यात ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद, वाचा आकडेवारी

Russia Ukraine War | रशियन सैनिकांविषयी ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

“माझा नंबर पहिला येतो, पण काही लोक….”; फडणवीसांचा घणाघात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More