Top News

मी नाराज नाही, काहीजण चुकीच्या बातम्या पसरवत आहेत- एकनाथ शिंदे

मुंबई | महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून नेत्यांचं नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. याआधी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार नाराज असल्याच्या चर्चा झाल्या त्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा होत होती. यावर शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मी नाराज नाही. तसेच काहीजण चुकीच्या बातम्या पसरवत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शिंदे यांच्याकडे असणारे नगरविकास खात्याचे विभाजन करुन नगरविकास खाते-3 हे नवीन खाते तयार करण्याची ठाकरे सरकारची तयारी सुरु असल्याचं कळतंय.

ठाकरे सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न सुरु आहेत अशा चर्चा होत आहेत. त्यातच नवीन खाते तयार करुन शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिंदे यांचंं महत्व कमी करत असल्याचं बोललं जातंय.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद मिळेल असं बोललं जात होतं. त्यानंतर शिंदे यांच्याकडील गृहखातंही राष्ट्रवादीकडे देण्यात आलं.

ट्रेंडिंग बातम्या-

“महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही आणि ती कुणी करूही शकत नाही”

नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक यांची कामगारांना मारहाण

“शरद पवारांना ‘जाणता राजा’ कसे म्हणता? हा प्रश्न मोदींनाच विचारा”

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या