मुंबई | राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेत चुरस पहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या प्रियांका चर्तुर्वेदी या देखील संसदेत जाण्यास उत्सुक असल्याचं बोललं जात आहे. तसेच लोकसभेत पराभवाचा सामना करावा लागलेले नेतेही संसदेत जाण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे.
अन्य पक्षातून आलेल्या नेत्यांपेक्षा जुन्या जाणत्या नेत्यांनाच संधी मिळाली पाहिजे, असं काहीचं मत असल्याचं समजतंय. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील, अनंत गिते याचंही नाव चर्चेत आहे.
राष्ट्रवादीचे शरद पवार, अॅड. माजिद मेमन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, भाजपचे अमर साबळे, रिपाइंचे रामदास आठवले आणि अपक्ष संजय काकडे या सात जणांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत मार्च महिन्यात संपत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीकडून शरद पवार यांचं नाव निश्चित झालं आहे. तर भाजपकडून उदयनराजेंचं तिकीटही जवळपास कन्फर्म असल्याचं बोललं जातं. आता शिवसेनेच्या कोट्यातून कोणाची वर्णी लागणार, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या शिवसेनेतील दोन नेत्यांचे राजीनामे???
राम मंदिरासाठी ट्रस्ट, तर मग मशिदीसाठी का नाही?- शरद पवार
महत्वाच्या बातम्या-
“शिवसेनाप्रमुखांचं नाव देण्याचा युती पुन्हा जुळण्याशी संबंध नाही, एकत्र येऊ तेव्हा येऊ”
शरद पवारांशी बाँडिंग असलेल्या भाजप नेत्यांची घरवापसी होणार- छगन भुजबळ
‘संभव हो तो जाने से पहले एक बार जरुर मिलना’, भाजपचा मेसेज डावलून ‘हा’ नेता शिवसेनेत!
Comments are closed.