मुंबई | राजकीय हस्तक्षेप करणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना आवरा, अशा आशयाचं पत्र शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाहक भैय्याजी जोशी यांना लिहिलं आहे. बुधवारी अमृचा फडणवीस यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची तुलना रेशमी किड्याशी केली होती.
देवेंद्र फडणवीस यांची घमेंड आणि अतिआत्मविश्वास महाविकास आघाडी घडून येण्याचं खरं कारण आहे, अशी आठवणही तिवारी यांनी पत्रातून संघाला करून दिली आहे. दुसरीकडे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या पत्नींचं उदाहरण देत अमित शहा, नितीन गडकरी यांच्या पत्नी राहुल गांधी आणि सोनिया गांधींना शिव्या देत नाहीत, असं तिवारी यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस हे फार काळासाठी माजी मुख्यमंत्री राहणार नाहीत, अशा प्रकारचं वक्तव्य भैय्याजी जोशी यांनी काही दिवसांपूर्वीच केलं होतं. त्यांच्या याच विधानाचा संदर्भ लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी बोलताना जरा भान ठेऊन बोलायला हवं.
दरम्यान, याआधीदेखील अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांची बाजू घेत विरोधकांवर निशाणे साधणारे ट्वीट केले आहेत. विशेषत: सेनेवर त्यांनी कित्येकदा टीकेचे बाण सोडले आहेत.
ट्रेंडिंग बातम्या-
दुसऱ्याला वाचवायला जाऊन माझ्या मुलानं जीव गमावला; आयबी अधिकाऱ्याच्या आईची प्रतिक्रिया
‘प्रवासादरम्यान जातीचा दाखला हरवला’; खासदारकी वाचवण्यासाठी जयसिद्धेश्वरांची धडपड
महत्वाच्या बातम्या-
…म्हणून डॉन अरुण गवळीला न्यायालयाकडून पॅरोल मंजूर
‘येसूबाईं’ना नाही आवरेना लाठीकाठी खेळण्याचा मोह; पाहा व्हिडीओ
कोरेगाव भीमा प्रकरणातील 348, तर मराठा आंदोलनातील 460 गुन्हे मागे- अनिल देशमुख
Comments are closed.