बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेनेचा आणखी एक नेता भाजपच्या रडारवर?; किरीट सोमय्यांच्या त्या ट्विटने खळबळ

मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात चांगलेच अडचणीत सापडलेले संजय राठोड यांनी नुकताच आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी या राजीनाम्यानंतर एक ट्विट करून शिवसेनेच्या आणखी एका नेत्याचा घोटाळा उघड करणार असल्याचं सांगितलं आहे.

संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर सोमय्या यांनी केलेल्या ट्विट ने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. सोमय्या आणि भाजपच्या रडारवर असलेला शिवसेनेचा हा नेता कोण? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. तसेच त्या नेत्याबद्दल कोणतीही माहिती अद्याप त्यांनी जाहीर केलेली नाही.

येणाऱ्या काही दिवसात आता शिवसेनेचा कोणता नेता किरीट सोमय्या यांच्या रडारवर आहे हे कळेलच पण या सर्व गोष्टीमुळे सेनेच्या गोटात अनेक चर्चा रंगत असल्याचं चित्र दिसून येत आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडी आणि विशेषतः शिवसेनेवर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका झाली आणि परिणामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांना संजय राठोड यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा लागला. आता सोमय्या कोणत्या नेत्याचा पर्दाफाश करणार? हा मुद्दाही या अधिवेशनात गाजण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या-

संजय राठोड यांचा राजीनामा घेण्याची गरज नव्हती, पण…- संजय राऊत

‘मुख्यमंत्र्यांचं आता त्यांचे युवराजही ऐकत नाहीत का?’; व्हिडिओ शेअर करत मनसे नेत्याची आदित्य ठाकरेंवर टीका

“काही लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने दुकानं चालवून संसदेत जातात”

पूजा चव्हाणची आजी म्हणणाऱ्या शांताबाईंचं पितळ उघडं, पूजाच्या वडिलांनी केला मोठा खुलासा

अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली कोरोनाची लस, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More