मुंबई | बाप हा बाप असतो, बाप कसा बदलणार? असा बोचरा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. भाजप शिवसेना युती संदर्भातलं घमासान चालू असताना राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीसांना लक्ष्य केल्याचं दिसतंय.
मुख्यमंत्री फडणवीस हिंदुत्वासाठी युती व्हावी असे बोलत आहेत. परंतु देशात राम मंदिर, समान नागरी कायदा, कलम 370, काश्मीर प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत. हे सगळे हिंदुत्वाशी संबधित प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडवणे म्हणजे राजकीय हिंदुत्व, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आलेली असताना देखील भाजप-शिवसेना युतीच्या चर्चेतून अद्याप मार्ग निघालेला दिसत नाही. दरदिवशी दोन्ही पक्षातल्या नेत्यांकडून आक्रमक प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत.
दरम्यान, शिवसेना-भाजपच्या युतीचा वाद सोडवण्यासाठी मी पुढाकार घेईल, असं पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासमंत्री महादेव जानकरांनी उस्मानाबाद येथे म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
–…तर भाजप खासदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार???
–“ओबीसी आरक्षणाबाबत सरकारनं गांभीर्याने कार्यवाही करावी”
–ऐका मोहम्मद शमीचं इंग्लिश… ऐकून तुम्हीही हसाल!
-…आणि अजित पवारांसमोरच भिडले राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक
-2009 सारखचं राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला दणदणीत यश मिळेल!