महाराष्ट्र मुंबई

…तर महाराष्ट्रानं भाजपची पाठ थोपटली असती; भाजपच्या आंदोलनावर संजय राऊत संतापले

मुंबई | राज्य सरकारच्या कामाबद्दल भाजपनं आज राज्यभर आंदोलन केलं. या आंदोलनावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.

आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातला हलवल्यानंतर भाजपनं काळ्या पट्ट्या, काळ्या हाफ चड्ड्या घालून आंदोलन केलं असतं तर जनतेनं त्यांची पाठ थोपटली असती, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपच्या आंदोलनाचा समाचार घेतला आहे.

राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीत भाजपनं राज्य सरकारचे आणि महाराष्ट्राचे हात बळकट करण्याची गरज आहे. आंदोलन करण्याची ही वेळ नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधलाय.

कोरोनामुळे राज्यात आणि मुंबईत निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याची टीका प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून करण्यात येत आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

पुण्यातील ‘हा’ भाग नवा कंटेन्मेंट परिसर घोषित; एकाच दिवशी सापडले 19 कोरोनाबाधित रुग्ण

आम्हाला डोमकावळे म्हणताय, जनता तुम्हाला लबाड लांडगे म्हणते; शेलारांची टीका

महत्वाच्या बातम्या-

…’या’ गोष्टीमुळं शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नाराज

कोरोनाशी लढा देण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरतंय का?, आजची आकडेवारी धक्कादायक

‘…तर पुढचे परिणाम अतिशय गंभीर असतील’; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे सरकारला इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या