Top News

ठाकरेंच्या सभेसाठी शाळेची भिंत तोडली, परीक्षा देखील रद्द

उस्मानाबाद | युतीचे उमेदवार कैलास गाडगे पाटील यांच्या प्रचारासासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची उस्मानाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी शाळेची संरक्षण भिंत दोन ठिकाणी तोडण्यात आली आहे तसंच विद्यार्थ्यांच्या परिक्षा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे उस्मानाबादमध्ये हा चर्चेचा विषय बनला आहे.

उध्दव ठाकरे यांची सभा उस्मानाबाद येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर होणार आहे. सभा स्थळी शाळेची संरक्षण भिंत दोन ठिकाणी तोडून रस्ता बनवण्यात आल्याचं कळतय.

सभेसाठी घेण्यात आलेल्या परवानगीमध्ये संरक्षण भिंत तोडावी असा कुठेही उल्लेख केला नव्हता. तरी सुध्दा आयोजकाने भिंत तोडून रस्ता बनवला आहे.

जिल्हा परिषद शाळेतील 10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरु आहे. मात्र उध्दव ठाकरेंच्या सभेमुळे 10 वीच्या विद्यार्थ्यांच्या वेळापत्रकात बदल करत त्यांचा पेपर 10 ऐवजी सकाळी 7 वाजता घेण्यात आला. तर 11 वीच्या विद्यार्थ्यांचा केमिस्ट्री विषयाचा पेपर रद्द करण्यात आल्याचं समजतंय.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या