महाराष्ट्र मुंबई विधानसभा निवडणूक 2019

“भाजपनं विकृतीला स्वीकारलंय; राणेंचा पाचवा पराभव करणार”

Loading...

रत्नागिरी | शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी राणेंना प्रवेश दिल्याने भाजपवर सडकून टीका केली. भाजपनं विकृतीला स्वीकारलं आहे, मात्र आम्ही नितेश राणेंच्या रुपात राणेंचा पाचवा पराभव करु, अशी जहरी टीका राऊत यांनी केली आहे.

नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे कणकवली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक मैदानात आहेत. मात्र त्यांच्यासमोरील अडचणी वाढणार असल्याचं दिसत आहे. विनायक राऊत यांनी राणेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

Loading...

नितेश राणे हे महायुतीचे उमेदवार होवू शकत नाही. त्यामुळे आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही. शिवसेनेचे दुश्मन असलेल्या राणेंना तिकिट देवू नका अशी भाजपला वारंवार विनंती केली होती, असं विनायक राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, शिवसेना-भाजप युती झाली असली तरी राज्यात अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांसमोर उभे राहिले आहेत. कोकणात शिवसेना-भाजपमधील हा संघर्ष टोकाला गेल्याचं दिसत आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या- 

 

 

Loading...

 

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या