
मुंबई | शिवसेना-भाजप एकत्र यावेत, यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. पण युती झाली नाही तर शिवसेनेचं जास्त नुकसान होईल, असं भाकित रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी वर्तवलं आहे.
मुख्यमंत्र्यांची मी भेट घेतली आहे. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन युतीबाबत प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मला पुन्हा एकदा लोकसभेवर जायचं आहे, त्यासाठी शिवसेनेच्या कोट्यातील दक्षिण मध्य मुंबईची जागा देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, वंचित आघाडी वंचितांना सत्तेपासून दूर ठेवणारी आहे, असं म्हणत त्यांनी टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
–कॅन्सर पीडिताला लाखोंचा गंडा घालणाऱ्या हाॅटेल मालकाला मनसेची ‘लाईव्ह’ मारहाण
-18 वर्षांपासून माझ्यावर बलात्कार, आता माझ्या मुलीवर नजर; राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यावर आरोप
–“काँग्रेस आमच्या बरोबर आली असती तर ते 100 च्या पुढे गेले असते”
-“ओवैसी 25 तारखेला मुंबईत येणार, दम असेल तर शिवसेनेनं आडवून दाखवावं!”
–‘कॅन्सर’शी झूंज देत असलेल्या मनोहर पर्रिकरांचा ‘मेरा परिवार, भाजप परिवार’मध्ये सहभाग