शिवसेना आणि मनसे या पक्षांनी मुंबईतील मराठी माणसांसाठी काहीच केलं नाही!

मुंबई | सतत मराठीचा आग्रह धरणाऱ्या शिवसेना आणि मनसे या पक्षांनी मुंबईतील लोकांना स्थिरता मिळावी म्हणून काहीच केलं नाही, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

मुंबईतील मराठी लोकांचा टक्का कमी झाला आहे. त्यामुळे आता उत्तर भारतीयांची मतं मिळवण्यासाठी ठाकरे बंधू पुढं येत आहेत, असं पाटील यांनी म्हटलं. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या मेळाव्याला लावलेली उपस्थिती हे फक्त मतांसाठी केलेलं राजकारण आहे, असं त्यांनी म्हटलं.

दरम्यान, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते ही खेळी करत आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-आला रे आला… मराठमोळा टच असलेला ‘सिम्बा’चा ट्रेलर आला!

-मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल; आरक्षण घटनाबाह्य असल्याचा दावा

-वादग्रस्त व्हीडिओ प्रकरणी आयपीएस भाग्यश्री नवटकेंना पहिला झटका!

-मनोहर जोशींची निवृत्तीची मागणी; उद्धव ठाकरेंचा मात्र नकार

-हैदराबादचं नाव बदलून भाग्यनगर करणार; योगी आदित्यनाथांचं आश्वासन