शिवसेनेच्या नेत्यांवर पुन्हा अन्याय! मोठं कारण आलं समोर

Eknath Shinde

Shivsena minister upset l विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, त्यामुळे राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा एकदा स्थापन झालं आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र शपथविधी सोहळ्यानंतर अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष हे मंत्रिमंडळ विस्तारकडे लागलं होत. त्यानंतर 15 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या 19 तर शिवसेनेच्या 11 आणि राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र आता मंत्रिमंडळ विस्तार व खातेवाटपानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी त्यांच्या मनातील खंत बोलून दाखवली आहे.

राज्यात भाजपचा दबदबा :

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना पक्ष हा गृहमंत्रालयासाठी आग्रही होता, मात्र हे खातं भाजपकडेच ठेवण्यात आलं. दरम्यान, खातेवाटपात देखील भाजपचा दबदबा कायम राहिल्याचं पाहायला मिळालं आहे. कारण मुख्यमंत्रिपद, गृहखांत, महसूल खातं अशी अनेक मोठी खाते भाजपच्या मंत्र्यांना मिळाली आहेत. तर एकनाथ शिंदे यांना नगरविकास खांतं तसेच गृहनिर्माण खातं यावेळी देण्यात आलं आहे.

दरम्यान, खाते वाटपानंतर आता नव्या मंत्र्यांना बंगल्याचं वाटप करण्यात आलं आहे. मात्र यावेळी बंगल्याचं वाटप करत असताना देखील भाजपच्या मंत्र्यांना बंगले देण्यात आले. तर शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांना मात्र बंगल्याऐवजी फक्त फ्लॅट देण्यात आले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Shivsena minister upset l शिवसेनेचे मंत्री नाराज :

भाजपच्या नेत्यांना बंगले देण्यात आले आहेत. मात्र शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांना बंगल्याऐवजी फक्त फ्लॅट देण्यात आल्याने शिवसेनेवर पुन्हा एकदा अन्याय झाल्याचे दिसून येत आहे. कारण शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट, प्रातप सरनाईक आणि भरत गोगावले यांना बंगल्याऐवजी फ्लॅट देण्यात आले आहेत.

मात्र या तीन मंत्र्यांना बंगल्याऐवजी फ्लॅट मिळाल्यामुळे त्यांनी मनातील खंत व्यक्त केली आहे. भाजपच्या मंत्र्यांना बंगले मिळाले तर शिवसेनेच्या काही मंत्र्यांना मात्र फ्लॅट देण्यात आला असल्याचं त्यांनी म्हंटल आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याचं चित्र दिसत आहे.

News Title – Shivsena minister upset over bungalow allocation

महत्त्वाच्या बातम्या-

उद्धव ठाकरे अ‍ॅक्शनमोडवर! लवकरच निवडणुकीचा धुराळा उडणार?

बीडच्या ‘आका’बद्दल आमदार सुरेश धसांचा धक्कादायक खुलासा!

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता!

‘कोणत्या दुनियेत आहात धनूभाऊ?, काही सिरीयसनेस…’, सरपंच हत्येवर आमदार धस संतापले

ट्रायने मोबाईल रिचार्ज संदर्भात घेतला सर्वात मोठा निर्णय!

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .