बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अमृता फडणवीसांनी राऊतांवर केलेल्या टीकेला शिवसेनेचं प्रत्युत्तर, म्हणाले, ‘मामी गप्प बसा’

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात आरोपांची मालिका सुरू केली. संजय राऊतांनी किरीट सोमय्यांवर केलेल्या आरोपांनंतर अनेक भाजप नेत्यांनी राऊतांवर निशाणा साधला.

संजय राऊत यांची पत्रकार परिषद संपताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करत संजय राऊतांना टोला लगावला होता. ‘आज फिर एक बिल्लीने दहाड़ने की कोशिश की है’, असं ट्विट करत अमृता फडणवीसांनी राऊतांना डिवचलं होतं.

शिवसेनेच्या नेत्या व आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी अमृता फडणवीसांच्या ट्विटचा खरपूस समाचार घेतला आहे. ‘शेर की दहाड़ से डरी हुई बिल्लीया आवाज निकालने की कोशिश कर रही है! मामी गप्प बसा’, असं ट्विट करत मनिषा कायंदेंनी अमृता फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, मनिषा कायंदे यांनी अमृता फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला भाजपकडून काय प्रत्युत्तर येतं याकडे लक्ष लागलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

‘… तर हो मी ब्लॅकमेलर आहे’ -किरीट सोमय्या

“जोड्यानं मारू मला म्हणताय की रश्मी ठाकरेंना?”

‘बाप बेटे जेल मधे जाणार’, संजय राऊतांचं सूचक ट्विट

Lassa Fever | ओमिक्रॉननंतर लासा फिवरची दहशत, ‘या’ व्यक्तींना आहे सर्वात जास्त धोका

डिस्को किंग काळाच्या पडद्याआड, सुप्रसिद्ध गायक बप्पी लाहिरी यांचं निधन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More