शिवसेना आमदाराचं स्तुत्य पाऊल; पूरग्रस्त गाव घेतलं दत्तक

कोल्हापूर |  कोल्हापूर सांगलीतला पूर आता हळूहळू ओसरायला लागला आहे. परंतू तिथल्या नागरिकांना आता भीषण अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यांच्या अडचणी सोडवण्याकरिता आपल्या मदतीचा हातभार लागावा म्हणून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक पुढे सरसावले आहेत.

आमदार प्रताप सरनाईक यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी हे पूरग्रस्त गाव दत्तक घेतलं आहे.  या गावातील 325 कुटुंबांना लागेल ती मदत करण्याचं त्यांनी ठरवलं आहे.

शिवसेनेच्या अनेक शाखांनी पूरग्रस्तांना भरभरून मदत केली आहे. अनेक शिवसैनिक मदतीसाठी कोल्हापूर सांगली भागात पोहचले आहेत. मंत्री एकनाथ शिंदे सांगली कोल्हापूरात तळ ठोकून होते.

दरम्यान, सरनाईक यांनी जसं पूरग्रस्त गाव दत्तक घेतलं तशीच गावं विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी दत्तक घ्यावीत, अशी अपेक्षा लोक आता व्यक्त करू लागली आहेत.


महत्वाच्या बातम्या-

-विंग कमांडर अभिनंदन यांचा स्वातंत्र्यदिनी ‘वीरचक्र’ने गौरव होणार!

-काँग्रेसचं शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांना भेटणार; मांडणार पूरग्रस्तांच्या व्यथा

-राज ठाकरेंच्या ‘होम मिनिस्टर’ पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर!

-“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत… फडणवीस की येडीयुरप्पा???”

पूरग्रस्तांच्या मदतीला उर्मिला मातोंडकर कोल्हापूर-सांगलीत!