महाराष्ट्र मुंबई

‘जान कुमार सानूला बिग बॉसमधून हाकला अन्यथा…’; मनसेनंतर शिवसेनेचाही आक्रमक पवित्रा

मुंबई | बिग बॉसच्या 14 पर्वात प्रसिद्ध गायक कुमार सानूचा मुलगा जान कुमार सानूने मराठी भाषेबद्दल केलेल्या अपमानकारक वक्तव्यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. अशातच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी जान कुमार सोनूला बिग बॉस स्पर्धेतून हाकलण्याची मागणी केली आहे.

मुजोर जान कुमार सानू याची या मालिकेतून हकालपट्टी केली नाही. तर सेटवर येऊन शिवसेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल, असा इशारा सरनाईक यांनी दिला आहे.

मला मराठीची चीड येत असल्याचं जान कुमार सानूने म्हटलं आहे. त्याच्या या वादग्रस्त वक्तव्याने शिवसेना- मनसे पक्षांनी आक्रमक पवित्रा घेत त्याच्यावर कारवाईची मागणी केली आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांनी तर जान कुमार सोनूला धमकीवजा इशाराच दिला आहे.

दरम्यान, मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू तेच बघतो आता मी. लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. तुला थोबडवनार लवकरच आता आम्ही मराठी, असं खोपकरांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘माझा मुलगा अवघ्या 15 मिनिटात झाला कोरोनामुक्त’; डोनाल्ट ट्रम्प यांचा अजब दावा

‘तुला थोबडवनार लवकरच, मुंबईत राहून कसं करिअर बनवतो तेच बघतो’; खोपकरांचा बिग बॉसमधील स्पर्धकाला इशारा

लवकरच मुंबईकरांसाठी लोकल सेवा होणार सुरु; ठाकरे सरकारने दिले संकेत

‘शरद पवारांनी तो प्रश्न केला आणि….’, तिकीट नाकारण्यासंदर्भात सुजय विखेंचा मोठा गौप्यस्फोट

नितीश कुमार भाजपाला धोका देतील; चिराग पासवान यांची टीका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या